केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानाच्यावतीने नुकतेच ‘डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. वर्ष 2011 चा डॉ.आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार प्रा.सुखदेव थोरात यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्काराच्या रचना अथवा पुरस्काराविषयची अधिक माहिती पुढील प्रमाणे आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म शताब्दी वर्ष 1992 मध्ये गठीत समितीद्वारे ‘डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार’ देण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून या पुरस्काराचे वितरण केले जाते.

हा पुरस्कार शोषित, पीडित आणि मागासवर्गीयांसाठी अभूतपुर्व योगदान देण्यासाठी तसेच समाजात सामाजिक सदभाव निर्माण करण्यासाठी प्रदान करण्यात येतो.

हा पुरस्कार विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला, सामाजिक संस्थेला त्यांच्या समाजातील मागासवर्गीयांप्रती केलेल्या कामाचा यथोचित सन्मानार्थ प्रदान केला जातो.

पुरस्कार विजेत्या व्यक्ती अथवा संस्थेचे नामाकंन त्यांच्या केलेल्या कार्याद्वारे समाजात झालेल्या सकारात्मक परिणामावरून केले जाते.

पुरस्कारर्थी निवडीमध्ये आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे मागसवर्गीयांच्या आयुष्यातील सकारात्मक बदल आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उचललेली पावले हे आहेत.

पुरस्काराचे स्वरूप 10 लाख रूपये रोख आणि प्रशस्ती पत्र असे आहे.

पुरस्कारासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष उपराष्ट्रपती असतात. यासह भारताचे मुख्य न्यायमुर्ती, पत्रकार, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, यासह दोन असे व्यक्ती ज्यांचे सार्वजनिक जीवनात मोठे योगदान आहे, अशा व्यक्तींची समिती नेमली जाते.

लेखक - अंजू सुनील निमसरकर

माहिती अधिकारी

महाराष्ट्र परिचय केंद्र,नवी दिल्ली

माहिती स्रोत: महान्युज