कामांचे स्वरूप, प्राधान्य व तत्वे अकुशल रोजगाराची पूर्तता, दिर्घकालीन टिकणारी कामे व त्याद्वारे सामाजिक पायाभूत सोयी उपलब्ध करुन देऊन ग्रामीण जनतेचे राहणीमान उंचावेल व कायमस्वरुपी मालमत्ता तयार होईल अशा प्रकारे योजनेची अंमलबजावणी करणे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महाराष्ट्र अंतर्गत कामाचे स्वरुप व प्राधन्यता (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम, 2005 मधील शेडयुल 1 नुसार) १. जलसंधारण व जलसंवर्धन कामे २. दुष्काळ प्रतिबंधक कामे (वनीकरण व वृक्ष लागवडीसह) ३. जलसिंचन कालव्यांची कामे (लघु व सुक्ष्म जलसिंचन कामासहित) ४. अनुसूचित जातीजमाती, द्रारिद्रयरेषेखालील, भुसुधार खालील व इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, कर्जबाजारी लहान व अल्पशेतकरी यांच्या जमिनीसाठी जलसिंचन निर्माण करणारी कामे, फळझाड व भूसुधार कामे. ५. पारंपारिक पाणीसाठयांच्या योजनेचे नुतनीकरण करणे व तलावातील गाळ काढणे. ६. भूविकासाची कामे ७. पूरनियंत्रण, पूरसंरक्षणाची कामे, पाणथळ क्षेत्रात चा-याची कामे ८. ग्रामीण भागात बारमाही जोडरस्त्यांची कामे ९. राजीव गांधी भवन १०. केंद्रशासनाशी सल्लामसलत करुन राज्यशासनाने ठरविलेली कामे. स्त्रोत : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र