राज्यातील पंचायतीराज संस्थतील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या राज्यस्तरीय बैठका, प्राशिक्षण कालावधीत निवासी सोय व्हावी, राज्यातील स्वंयसहायता बचतगटाच्या वस्तुसांठी विक्रीची सोय व्हावी, या करीता प्लॉट नं.76 अे, सेक्टर-21 खारघर नवी मुंबई येथे ग्रामविकास भवन प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रकल्प अंमलबजावणी ग्राम विकास भवन प्रकल्पाचे बांधकाम सिडकोमार्फत ठेव अंशदान पध्दतीने कार्यान्वित. प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ : 4137.93 चौ.मी. (44,525 चौ.फू.) प्रकल्पाची एकूण सुधारीत किंमत : रुपये 35.68 कोटी प्रकल्पातील सोयी सुविधा 475 आसनक्षमतेचे भव्य सभागृह 100 प्रक्षिणार्थी क्षमतेचे सर्व सोयींयुक्त्त प्रशिक्षण केंद्र सर्व सोयींसुविधांयुक्त 75 निवासी खोल्या 100 आसनक्षमतेचे भोजनगृह व स्वयंपाकगृह स्वयंसहाय्यता बचतगटांच्या वस्तूंच्या विक्रीसाठी 33 दुकाने 50 वाहन क्षमतेचे वाहनतळ स्त्रोत : ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन संकलन : छाया निक्रड