ज्या स्वातंत्र्यसैनिकांना स्वतःचे घर नाही, अशा स्वातंत्र्यसैनिकांना त्यांच्या राहत्या गावात घर घेण्यासाठी 10 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची शासनाची योजना आहे. महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक क्रमांक संकिर्ण 1916/प्र.क्र.83/16/स्वासैक-1, मंत्रालय, मुंबई दिनांक 28 सप्टेंबर, 2016 नुसार प्रत्येक जिल्ह्यातून लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या योजनेत ज्या स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांच्या हयात पत्नीला अजूनही स्वत:चे घर नाही अथवा त्यांच्या निकटवर्ती यांच्या नावे घर नाही अशा लाभार्थ्यांना अर्थसहाय्य दिले जाते.

लाभार्थी निश्चित होण्यासाठीचे निकष

स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांच्या हयात पत्नीच्या नावे (स्त्री स्वातंत्र्यसैनिक असल्यास तिच्या नावे किंवा तिच्या हयात पतीच्या नावे) किंवा त्यांच्या निकटवर्तीयांकडे महाराष्ट्रात किंवा भारतात किंवा इतर देशात कोठेही स्वत:चे घर नाही, असे स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांची पत्नी, पती अर्थसहाय्यासाठी अर्ज करु शकतील.

त्यासाठी नमुन्यात अर्ज व प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहील.

निकटवर्तीय यामध्ये स्वातंत्र्यसैनिकांचा मुलगा आणि मुलगी, त्याच्या नामनिर्देशनाच्या आधारे ज्या व्यक्तीस शासकीय नोकरी मिळाली आहे अशी व्यक्ती यांचा समावेश आहे.

राज्य शासनाकडून निवृत्तीवेतन घेणारे महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसैनिक किंवा केंद्र शासनाकडून निवृत्तीवेतन घेणारे महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसैनिक अर्थसहाय्यासाठी अर्ज करु शकतील. स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांची पत्नी, पती यापैकी एकजण हयात असणे आवश्यक आहे. ते किंवा त्यांच्या नावाने त्यांचे निकटवर्तीय यांना अर्ज सादर करता येईल.

स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांच्या हयात पत्नीच्या नावे (स्त्री स्वातंत्र्यसैनिक असल्यास तिच्या नावे किंवा तिच्या हयात पतीच्या नावे) किंवा त्यांच्या निकटवर्तीयांकडे मागील 10 वर्षांपासून स्वत:चे घर नाही, याविषयीचा पुरावा म्हणून

स्वातंत्र्यसैनिकाच्या वडिलांचे ज्यावेळी निधन झाले त्यावेळी स्वातंत्र्यसैनिकाच्या वडिलांचे नावे असलेल्या मिळकतीबाबतचा दाखला.

वडिलोपार्जित मिळकतीच्या वाटण्या झाल्यानंतर स्वातंत्र्यसैनिकाच्या वाट्यास आलेल्या वडिलोपार्जित मिळकतीबाबतचा दाखला.

स्वातंत्र्यसैनिकाच्या निकटवर्तीयाच्या नावे असलेल्या मिळकतीबाबतचा दाखला.

मागील 10 वर्षांपासून स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांची हयात पत्नी (स्त्री स्वातंत्र्यसैनिक असल्यास ती किंवा तिचा हयात पती) भाड्याच्या घरात राहत असल्याबाबतचा पुरावा म्हणून घर मालकाबरोबर झालेल्या नोंदणीकृत करारनाम्याची साक्षांकित प्रत इत्यादी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

तसेच स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांची हयात पत्नी (स्त्री स्वातंत्र्यसैनिक असल्यास ती किंवा तिचा हयात पती) यांनी किंवा त्यांच्या निकटवर्तियाने महाराष्ट्रात कोठेही म्हाडा, सिडको यांच्या गृहनिर्माण प्रकल्प योजनेचा किंवा शासनाच्या अन्य गृहनिर्माण प्रकल्प योजनेचा किंवा घरबांधणी योजनेचा यापूर्वी लाभ घेतला असल्यास ते अर्थसहाय्य मिळण्यास अपात्र राहतील.

स्वातंत्र्यसैनिकांचा मुलगा किंवा मुलगी यांना किंवा स्वातंत्र्यसैनिकांच्या नामनिर्देशनाच्या आधारे ज्या व्यक्तीस शासकीय नोकरी मिळाली आहे आणि अशा व्यक्तीस शासकीय निवासस्थान मिळाले असल्यास ते अर्थसहाय्य मिळण्यास अपात्र राहतील. स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांची हयात पत्नी (स्त्री स्वातंत्र्यसैनिक असल्यास ती किंवा तिचा हयात पती) किंवा त्यांच्या निकटवर्तीयास यापूर्वी घरासाठी जमीन किंवा शेतीसाठी जमीन देण्यात आली असल्यास ते अर्थसहाय्य मिळण्यास अपात्र ठरतील.

स्वातंत्र्यसैनिकास दोन किंवा दोनपेक्षा अधिक पत्नी असतील आणि अशा स्वातंत्र्यसैनिकाचा मृत्यू झाला असल्यास, त्याच्या पत्नींना केवळ एका घरासाठी अर्थसहाय्य मिळण्याकरिता अर्ज करता येईल. अशावेळी दोन्ही पत्नींनी विचारविनिमय करुन कोणाच्या नावे अर्ज करावयाचा आहे हे सहमतीने ठरवावे.

घरासाठी अर्थसहाय्य मिळविण्यास इच्छूक असलेल्या स्वातंत्र्यसैनिकांनी आवश्यक कागदपत्राच्या साक्षांकित प्रतीसह विहित नमुन्यात अर्ज संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावयाचे आहे. प्राप्त झालेल्या अर्जासह कागदपत्रांची छाननी करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून सदस्य सचिव निवासी उपजिल्हाधिकारी हे आहेत. तर उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा समाजकल्याण अधिकारी, प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा हे सदस्य आहेत.

संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव.

स्त्रोत : महान्युज