पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा उद्देश अपघातग्रस्त व्यक्तींना विमा सुरक्षा देने हा आहे. ठळक वैशिष्ट्ये रुपये १२ वार्षिक हप्ता लाभार्थी वयोगट १८ ते ७० लाभ - जखमी झाल्यास १ लाख रुपये व मृत्यू झाल्यास २ लाख रुपये भरपाई अट - फक्त बँकेत खाते असणे आवश्यक कोणीही लाभ घेवू शकतो महत्वाच्या बाबी एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी हि एम अपघात विमा योजना आहे. दर वर्षी नुतनीकरण आवश्यक. बँका व सार्वजनिक क्षेत्रातील इन्शुरन्स कंपन्या यांच्या सहयोगाने या योजनेचे परिचालन केले जाईल. १८ ते ७० वयोगटातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतील. एकाच व्यक्तीची अनेक बचत खाती असतील तर अशी व्यक्ती कुठल्याही एका बचत खात्याद्वारे हा विमा उतरवू शकेल. विमा उतरविणाऱ्या व्यक्तीचा आधार क्रमांक पायाभूत मानला जाईल. योजनेचा कालावधी दर वर्षी १ जून ते ३१ मी असा राहील व विमा हप्ता बँक खात्यात परस्पर नवे टाकला जाईल. पुढील वर्षाच्या नूतनीकरणाचा अर्ज ३१ मे पर्यंत देणे आवश्यक राहील. योजनेत सहभागी होन्यासाठीचा काळ सरकार सुरवातीला ३ महिने पर्यंत वाढवू शकते. अपघात विमा भरपाई पुढील प्रमाणे मिळेल - मृत्यू र. २ लाख दोन्ही डोळ्यांची संपूर्ण आणि बरी न होणारी हानी / दोन्ही हात किंवा दोन्ही पाय निकामी होणे / एक डोळा आणि एका हात किंवा एक पाय निकामी होणे रु. २ लाख एका डोळ्याची संपूर्ण आणि बरी न होणारी हानी किंवा एक हात किंवा एक पाय निकामी होणे रु. १ लाख विमाहप्ता रु. १२/- प्रती व्यक्ती प्रती वर्ष राहील व बँक बचत खात्यात परस्पर नावे टाकला जाईल. विमा ध्र्काने वय वर्षे ७० पूर्ण केल्यावर / बँकेच्या बचत खात्यात विमा हप्ता नवे टाकण्यास पुरेशी शिल्लक नसेल तर / बँक खाते बंद केले तर विमा संरक्षण संपुष्टात येईल. तांत्रिक अडचणीमुळे संपुष्टात आलेली विमा पॉलिसी काही अटींची पूर्तता केल्यावर पुन्हा चालू करता येईल. आपण याची माहिती टोल फ्री क्रमांकाद्वारे हि मिळवू शकता प्रत्येक राज्यानुसार टोल फ्री क्रमांक दिले आहेत. तसेच एक राष्ट्रीय टोल फ्री नंबर देखील आहे: महाराष्ट्रासाठीचा टोल फ्री क्रमांक आहे : महाराष्ट्र बँक - १८००-१०२-२६३६ राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक : १८००-१८०-११११ /१८००-११०-००१ पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेशी संबधित नेहमीचे विचारले जाणारे प्रश्न (FAQ) आणि त्याला दिलेली उत्तरे पाहण्यासाठी येथे क्लिक करा पंतप्रधान सुरक्षा विमा योजना ग्राहक नोंदणी नमुना फॉर्म (समती पत्र / घोषणा फॉर्म) डाउनलोड करण्यासाठी / पाहण्यासाठी येथे क्लिक करा पंतप्रधान सुरक्षा विमा योजना दावा (क्लेम) फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी / पाहण्यासाठी येथे क्लिक करा अधिक माहितीसाठी आर्थिक सेवा विभाग, अर्थ मंत्रालय, भारत सरकार यांची जन धन से जन सुरक्षा हि वेबलिंक ओपन करा