ग्रामसभेमध्ये सभासदांना बोलण्याचा अधिकार आहे. तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद यांनी नियुक्त केलेले अधिकारी ग्रामसभेमध्ये बोलू शकतात. सदस्यांनी व अधिकाऱ्यांनी ग्रामसभेच्या अध्यक्षाची परवानगी घेऊन बोलावे. तसेच उभे राहून अध्यक्षांना अध्यक्ष महाराज असे संबोधून त्यांचेकडे पाहून बोलावे. अध्यक्षांनी सुद्धा माहिती विचारणाऱ्याकडे पाहून बोलावे. संदर्भ : लोकशाहीचे बलस्थान व गावाचे व्यासपीठ : ग्रामसभा वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट, पुणे