औरंगाबाद जिल्ह्यातील गोळेगावात स्पर्धेबरोबरच श्रमादानाला उत्साहात सुरुवात झाली. पण 'नव्याचे नऊ दिवस' या उक्ती प्रमाणे लवकरच हा उत्साह निवळला. यामुळे गोळेगाव चे सरपंच संतोष जोशी अत्यंत विचलित झाले. कमी झालेली संख्या परत वाढावी म्हणून त्यांनी अनेक प्रयत्न केले, पण काहीही उपयोग झाला नाही. आणि मग त्यांनी ठरवलं की "जर संपूर्ण गाव श्रमदानाला आलं नाही, तर मी स्पर्धा संपेपर्यंत एक वेळेस जेवणार!" काय झाला त्यांच्या या निर्णयाचा परिणाम, ते बघा ह्या व्हिडीओतून. कालावधी - 3.33 मिनिट स्त्रोत - पाणी फौंडेशन जिद्द सरपंचांची .