3 लाख 12 हजार 825 शौचालयांचे बांधकाम पूर्ण 1 लाख 53 हजार 510 शौचालयांचे बांधकाम प्रगतीपथावर देशातील 10 शहरांमधे राज्यातील पाचगणी, कागल, मुरुगुड, पन्हाळा व वेंगुर्ला या 5 शहरांचा समावेश हागणदारीमुक्त होणारी कोल्हापूर महानगरपालिका राज्यातील पहिली महानगरपालिका हागणदारीमुक्त शहरांमध्ये सर्वाधिक 13 शहरे पुणे जिल्हयातील अहमदनगर, कोल्हापूर, नागपूर जिल्हयातील प्रत्येकी 10 शहरे सिंधूदुर्ग व सोलापूर जिल्हयातील प्रत्येकी 8 शहरे पहिल्या टप्प्यात 19 शहरे हागणदारीमुक्त दुसऱ्या टप्प्यात 32 शहरे हागणदारीमुक्त तिसऱ्या टप्प्यात 36 शहरे हागणदारीमुक्त कोल्हापूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, चंद्रपूर, धुळे महानगरपालिका संपूर्ण हागणदारीमुक्त 2 ऑक्टोबर 2017 पर्यंत सर्व शहरे हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील 127 शहरे हागणदारीमुक्त करण्यात आली असून आतापर्यंत नागरी भागात 3 लाख 12 हजार 825 शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर 1 लाख 53 हजार 510 शौचालयांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. हागणदारीमुक्त झालेल्या शहरांमध्ये सर्वाधिक पुणे जिल्ह्यातील 13 शहरांचा समावेश आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर अहमदनगर, कोल्हापूर, नागपूर या जिल्ह्यातील प्रत्येकी 10 शहरे आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर सिंधूदुर्ग व सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येकी 8 शहरांचा समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात स्वच्छतेला अग्रक्रम देण्याचा निर्धार केला असून या निर्धाराच्या संकल्पपूर्तीसाठी देशात 2 ऑक्टोबर 2014 पासून स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानासाठी नगरविकास विभागाने ‘स्वच्छतेची सप्तपदी’ निश्चित केली असून हे अभियान 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत सुरु राहणार असले तरी या सप्तपदीच्या माध्यमातून राज्यातील सर्व नागरी भाग 2 ऑक्टोबर 2017 पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार राज्य शासनाने केला आहे. या अभियानाची फलश्रृती म्हणजे हागणदारी मुक्त शहरांच्या तपासणीसाठी केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात आलेल्या तपासणीत देशातील 10 शहरांमधे राज्यातील पाचगणी, कागल, मुरुगुड, पन्हाळा व वेंगुर्ला या 5 शहरांचा समावेश आहे. राज्यात सन 2011 च्या जनगणनेनुसार उघड्यावर शौचास जाणाऱ्या कुटूंबाची संख्या 8 लाख 32 हजार 672 आहे. त्यापैकी शौचालयाच्या मागणीसाठी 7 लाख 60 हजार 308 कुटूंबाचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 5 लाख 27 हजार 808 कुटूंबांचे अर्ज तपासण्यात आले आहेत. तर 4 लाख 46 हजार 521 कुटूंबाना शौचालय मंजूर करण्यात आले आहे त्यापैकी 3 लाख 12 हजार 825 शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून 1 लाख 53 हजार 510 शौचालयांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. यासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत प्रती शौचालय 12 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या अंमलबजावणीसाठी स्वच्छतेच्या सप्तपदी मधील पहिले पाऊल मध्ये महाड, माथेरान, रोहा, चिपळूण, खेड, दापोली, गुहागर, वेंगुर्ला, मोवाड, भगूर, मलकापूर, पन्हाळा, सातारा, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, मलकापूर, करमाळा, कुडूवाडी ही नगरपालिका व नगरपरिषदेची 19 शहरे 2 ऑक्टोबर 2015 रोजी हागणदारीमुक्त झाली आहेत. स्वच्छतेच्या सप्तपदी मधील दुसरे पाऊल मध्ये 26 जानेवारी 2016 पर्यंत चिखलदरा, कर्जत, मुरुड जंजिरा, पेण, राजापूर, मालवण, उमरेड, काटोल, मोहपा, रामटेक, महादूला, शिर्डी, शिरपूर-वरवाडे, फैजपूर, त्रिंबक, जयसिंगपूर, गडहिंगल्ज, कागल, कुरूंदवाड, मुरगूड, वडगांव कसबा, तळेगांव दाभाडे, इंदापूर, जेजूरी, सासवड, शिरुर, रहिमतपूर, दुधनी, मैंदर्गी, मंगळवेढे, सांगोले ही नगरपालिका व नगरपरिषदेची 31 शहरे तर कोल्हापूर महानगरपालिका अशी एकूण 32 शहरे हागणदारीमुक्त झाली आहे. संपूर्ण हागणदारीमुक्त होणारी कोल्हापूर महानगरपालिका ही राज्यातील पहिली महानगरपालिका ठरली आहे. राज्यात लोकसहभागातून स्वच्छतेची चळवळ अधिक गतीमान व्हावी यासाठी राज्य शासनाने प्रोत्साहन अनुदान योजना सुरु केली असून हागणदारीमुक्त झालेल्या अ, ब व क वर्ग शहरांसाठी अनुक्रमे रुपये 2 कोटी, रु. 1.50 कोटी व रु. 1 कोटी एवढे भरघोस प्रोत्साहन अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा लाभ घेण्यासाठी राज्यातील अधिकाधिक शहरांमध्ये हागणदारीमुक्तीची मोहिम अधिक जोमाने सुरु झाली आहेत. सप्तपदीच्या तिसरे पाऊल मध्ये पेठ उमरी, पाथरी, खोपोली, देवरुख, लांजा, सावंतवाडी, देवगड-जामसंडे, कुडाळ, वाभवे-वैभववाडी, कणकवली, भंडारा, तुमसर, पवनी, कळमेश्वर, खापा, नरखेड, मैंदा, देवळी, पुलगांव, संगमनेर, देवळाली प्रवरा, नंदूरबार, सटाणा, येवला, बारामती, दौंड, लोणावळा, आळंदी, भोर, जुन्नर, राजगुरुनगर, उरण इस्लामपूर, विटा, आष्टा, तासगांव, पंढरपूर ही 36 शहरे 2 ऑक्टोबर 2016 पर्यंत हागणदारीमुक्त झाली आहेत. त्याचबरोबर 2 ऑक्टोबर 2016 नंतर बदलापूर, बल्लारपूर, कोपरगांव, शेंदूरजना, खुलताबाद, पाथर्डी, रावेर, सावदा, जामनेर, कसाई-दोडामार्ग, बार्शी, रिसोड, मंगळूरपीर, जव्हार, श्रीगोंदा, भूम, अंबरनाथ, सिल्लोड, श्रीरामपूर, उमरगा, कन्नड, गेवराई, कळमनुरी, बिलोली, कंधार, मुदखेड, हदगांव, राहूरी, राहता पिंपळस, शिराळा, माहूर, इचलकरंजी ही नगरपालिका व नगरपरिषदेची 32 शहरे तर नवी मुंबई, चंद्रपूर, धुळे, पुणे, नाशिक, सांगली, वसई-विरार आणि अहमदनगर ही महानगरपालिकेची 8 शहरे हागणदारीमुक्त करण्यात आली आहे. लेखक -विलास बोडके स्त्रोत - महान्युज