स्वच्छता आणि आरोग्य ही उत्तम जीवनशैलीची लक्षणे आहेत आणि नाशिक मधील शहरांव्यतिरिक्त गावांमध्ये देखील अशी जीवनशैली असणे हे आपले शहर आरोग्यदायी असल्याचे उदाहरण आहे. याकरता, आपल्या सामाजिक उत्तरदायित्व योजने अंतर्गत सामाजिक-आर्थिक विकास, शाश्वत पर्यावरण आणि जवळील गावांमध्ये उत्तम आरोग्याचा प्रचार आणि विविध उपक्रमांद्वारे प्रसार करणे, यावर सुलाने कायम लक्ष केंद्रित केले आहे. आपल्या शाश्वत उपक्रमांसोबतच सुला विनयार्ड्सने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व योजने अंतर्गत दिलेल्या निधीतून दिंडोरी तालुक्यातील अवनखेड गावाला दोनशे कचरा पेट्या दिल्या. यात ओल्या आणि कोरड्या कचऱ्याकरता वेगवेगळ्या कचरापेट्या दिलेल्या असून, आता प्रत्येक गावकर्याच्या घरी या कचरापेट्या असून गावातील मध्यवर्ती दहा ठिकाणी सामुदायिक कचरापेट्या दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे या गावांमध्ये स्वच्छता राखणे सोपे झालेले आहे. यासोबतच गोवर्धन गावात “पर्यावरण उद्यान व आधुनिक व्यायामशाळेचे (ग्रीन जिम) लोकार्पण झाले. ग्रामपंचायती तर्फे सदर उद्यानाचे नामकरण “आई रमाई” असे करण्यात आले. सदर ठिकाणी सुला मार्फत ग्रीन जिमची ९ व्यायाम साहित्ये, आसन व्यवस्था व जॉगिंग ट्रॅक ई. सुविधा पुरविण्यात आल्या जेणे करून सदर परिसरातील ग्रामस्थ हे आरोग्याचे दृष्टीने सदर पर्यावरण उद्यानाचा तसेच आरोग्यदायी वातावरणाचा पुरेपूर लाभ घेतील. येथे केलेल्या वृक्षारोपणामुळे काही वर्षांनी येथील हिरवळ वातावरण शुद्ध करण्यासोबतच येथील जिम व जॉगिंग ट्रॅकचे सुशोभीकरण करेल. ग्रामपंचायत कार्यालय पर्यावरण उद्यान ग्रीन जिम साहित्य स्रोत : सुला विनयार्डस व सी एस आर