प्रस्तावना

यवतमाळ जिल्हयातील रुढा हे एक गाव आहे. गावांतील लोकसंख्या ७५० इतकी आहे. हे गांव डोंगरमाथ्यावर वसलेले असून दळणवळणाची सुविधा जेमतेम स्वरुपाची आहे. या गावामध्ये बहुतेक आदिवासी कोलाम, बौध्द, माळी व तेली समाज रहात आहे. दळणवळणाची योग्य सुविधा नसल्याने शिक्षणाच्या दृष्टीने हे एक मागासलेले गांव आहे. येथील शेतजमीन मध्यम व हलक्या स्वरुपाची आहे. शेतजमीनीमध्ये नगदी पिक कापुस तसेच तुर, सोयाबिन व हरबरा हे पिके घेतली जातात. लोकसंख्या कमी असल्याकारणाने या गावाला गट ग्रामपंचायत आहे. यवतमाळ जिल्हयापासून ५० कि.मी. अंतरावर हे गांव वसलेले आहे.

रुढा हे गांव सामजिक व अर्थिक मागासलेले असून व्यसनाधिनतेचे प्रमाण जास्त आहे. प्रत्येक समाजाप्रमाणे त्यांचे राहाणीमान वेगवेगळे आहे. गावामध्ये आरोग्या विषयी सुविधा नसल्याने आजाराच्या समस्याचे निवारण होत नाही. या कारणाने येथील लोकांची माणसिकता बिघडलेली होती. याचा परिणाम दिवसंदिवस कोणत्याना कोणत्या कारणावरुन गांवात वाद होत.

झालेला बदल

यातच एक दिवस सोन्याचा येतो ना तसा आमच्या गावांत महात्मा गांधी तंटामुक्त अभियान राबविण्यात आले. त्यावर गांवातुन एक समिती नेमण्यात आली. समिती मार्फत कोणत्याही समस्याचे निवारण होण्यास सुरुवात होवु लागली. गावांतील वाद मिटु लागले. यामुळे लोकांचा वेळ व पैशाची बचत होवु लागली. व्यसनाधिनतेकडे वळालेले लोक ग्रामसभा,मिटींगमध्ये सामील होवु लागले. व घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देवु लागले.

सन २०११ मध्ये तंटामुक्त गांव अभियाना मार्फत उत्कृष्ट गांव म्हणुन निवड झाली. त्यात गांवाला २ लाखाचे बक्षिस मिळाले. या बक्षिसाच्या माध्यमातून सर्व गावकरी व तंटामुक्त समिती यांनी गावांच्या विकासासाठी ज्या अडचणीची कमतरता आहे त्यावर उपाययोजना करण्यास सुरुवात केली व चांगल्या प्रमाणे समिती मार्फत गांव विकासाची कामे होण्यास सुरुवात झाली.

लेखनः गणेश गुरनुले