राज्य सरकारने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या नावाने ग्रामस्वच्छता अभियानाला सुरुवात केली. सदर अभियान इतके नावारुपाला आले की या अभियानाची अंमलबजावणी देशातील इतर राज्यांना कराविशी वाटली. सुरुवातीला दहा बारा वर्ष या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी झाली. ग्रामस्वच्छता अभियान नंतरच्या काळात मात्र या ग्रामस्वच्छता अभियानाला ग्रहण लागले. आता तर पाच वर्षापासून ग्रामस्वच्छता अभियान कागदावरच दिसून येत आहे. या स्वच्छता अभियानाची इतकी दुरावस्था झाली आहे की अख्खे गाव अस्वच्छतारुपी राक्षसाच्या विळख्यात सापडले आहे. म्हणून गाव खेडयातील अस्वच्छतेचा पाश नष्ट करण्यासाठी या नववर्षात ग्राम स्वच्छतेचा संकल्प करण्याची गरज आहे. शासनाच्या ग्राम स्वच्छता अभियाची केवळ बक्षिसे मिळविण्यासाठी काही गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. बक्षिसे घेतल्यानंतर ही गावे त्याच स्थितीत आली. गावातील अधिकारी ,पदाधिका-यांनी गावाच्या स्वच्छतेसाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. पण काही गावांनी मात्र आपल्या गावातील स्वच्छतेसाठी प्रामाणिकपणा बाळगला. स्वच्छतेसाठी पुरुस्कार गावाला स्वच्छतेसाठी पुरुस्कार मिळवून दिल्यानंतर आज गावाचे स्वच्छ ,सुंदर रुप कायम आहे. यात कुरखेडा तालुक्यातील सावरखेडा गावाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. संपूर्ण गावात दारुबंदी, कोणी दारु काढणार नाही आणि विकणार नाही. असा अलिखित दंडक गावातील मध्यवर्ती ठिकाणी असणा-या हनुमान मंदिरात नित्यनेमाने प्रार्थना गावात प्रवेश करतांना भव्य प्रवेशव्दार त्यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,संत गाडगेबाबा आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रवेशव्दारावरील छोटया मुर्त्या गावातील वैभवात अधिकच भर घालतात आजच्या स्थितीत शासनाचा कोणताही पुरस्कार नसतांना आजही गावात स्वच्छता राखली जाते. या गावात जाणाऱ्या अनाहूतांच्या तोंडातून सहज शब्द बाहेर पडतील. ते म्हणजे खेडयात- खेडा सावलखेडा. ग्रामस्वच्छता अभियानाची बक्षिसे मिळाल्यानंतर गावाच्या दुरावस्थेकडे लक्ष द्यायला कोणीही तयार नाही. गावखेडयाची स्थिती पाहून राष्ट्रसंताच्या विचारातील खेडयांची संकल्पना पार हदपार झाल. गावातील रस्त्याच्या दुतर्फा होणारी मानवीकृत घाण, शेणखताचे ढिग आणि सार्वजनिक रस्त्यावर वाढलेली अतिक्रमण पाहून खेडयाकडे चला असे म्हणण्याची हिंमत करणार नाही. म्हणून या नऊ वर्षाततरी ग्रामस्वच्छतेचा संकल्प्ा करण्याची गरज निर्माण झाली आहे. स्त्रोत : महान्यूज