तमिळनाडू राज्यातील एक जात. त्यांच्यात रूढ असलेल्या एका लोककथेनुसार अहल्येला इंद्रापासून जे तीन मुलगे झाले, त्यांपासून मरवन, कल्लन व आगमुदैयन या तीन जातींची उत्पत्ती झाली. आगमुदैयनांपैकीज्या लोकांचे राहणीमान उच्च दर्जाचे झाले, त्यांची गणना वेळ्ळाळ जातीत होऊ लागली. आगभुदैयन लोक मुख्यत: शेती करतात. आयनार, पिडारी व करुपण्णस्वामी यांसारख्या ग्रामदेवतांची पूजा करतात. लग्न लावण्यासाठी ते ब्राह्मण उपाध्याय

लेखिका : दुर्गा भागवत

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश