बचतगटाचे गाणे महिला बचतीचं प्रशिक्षण घेण्याचं अहो कारभारी, कारभारी, आज लवकर जायाचं महिला बचतीचं प्रशिक्षण घेयाचं महिला बचतीचं कौशल्य घेयाचं II ० II मूल्यमापनात कमी हाय कुठं प्रशिक्षणात समजून घेऊ पैसा बचतीत वाढवावयाचा कुठं त्याची गरज समजून घेऊ अहो जोडीनं, जोडीनं सारं ध्यानात घेयाचं II १ II कमी पडलो कुठं हो आपुन दिल्या ज्ञानाला ठेऊ साठवून केल्या कामाशी घेऊया मापून कच्च्या दुधालं घेऊया तापून दिल्या शिक्षणाचा, शिक्षणाचा पाठपुरावा घेयाचा II २ II घेऊन नव्या विचार, कल्पना आपल्या गटात माहिती देऊ मांडलेल्या नव्या संकल्पना बचत गटाची बैठक घेऊ सांगू समजून, समजून गट कशानं वाढवायचा II ३ लेखक : वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट स्त्रोत : बोल अनुभवाचे - पुस्तिका