प्रस्तावना फक्त एक किंवा दोन मुलींवर कुटुंब नियोजन शस्ञक्रिया करुन घेणा-या दारिद्रय रेषेखालील जोडप्यांसाठी ही योजना १ एप्रिल २००७ पासून सुधारित स्वरुपात लागू करण्यात आली आहे. अटी व शर्ती १. लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील कुटूंबातील असावा २. मुलगा नसताना एक किंवा दोन मुलींवर शस्त्रक्रिया केलेली असावी ३. नोंदणीकृत व अधिकृत ठिकाणी कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असावी लाभाचे स्वरूप जोडप्यास एक मुलगी असल्यास व कुटुंब नियोजन शस्ञक्रिया करुन घेतली असल्यास सदरच्या व्यक्तीस रुपये २०००/- रोख व रुपये ८०००/- मुलीच्या नावे राष्ट्रीय बचत प्रमाणपञाच्या स्वरुपात देण्यात येतात जोडप्यास दोन मुली असल्यास व कुटुंब नियोजन शस्ञक्रिया करुन घेतली असल्यास सदरच्या व्यक्तीस रुपये २०००/- रोख व रुपये ४०००/- प्रत्येक मुलीच्या नावे (एकूण रुपये ८०००/-) राष्ट्रीय बचत प्रमाणपञाच्या स्वरुपात देण्यात येतात संदर्भ : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन