आर्थिकदृष्टया मागास व दुर्बल घटकातील महिला व मुलींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन त्यांना अर्थार्जनाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी महिला प्रशिक्षण केंद्र चालविणा-या स्वयंसेवी महिला मंडळांना / संस्थांना सहाय्यक अनुदान देण्यात येते. ही योजना जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचेमार्फत राबविली जाते. आयुक्त, महिला व बाल विकास महिला व बाल विकास आयुक्तालय, 3 चर्च रोड, पुणे – 411 001.दुरध्वनी क्रमांक 020-26126690 ई-मेल : commissionerwcd@vsnl.net यंत्रणेची प्राथमिक माहिती यंत्रणेचे नाव : महिला व बाल विकास विभाग कोणासाठी :महिला किमान शैक्षणिक पात्रता :9 वी उतीर्ण वयोमर्यादा (वर्षे) : कमीत कमी 18लिंग: महिलाकार्यक्षेत्र : ग्रामीण / शहरीकौटुंबिक वार्षिक उत्पन्न (ग्रामीण भागासाठी) : आवश्यकता नाहीकौटुंबिक वार्षिक उत्पन्न (शहरी भागासाठी) :आवश्यकता नाही ठळक वैशिष्ठये आर्थिकदृष्ट्या मागास व दुर्बल घटकातील महिला व मुलींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन त्यांना अर्थार्जनाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी महिला प्रशिक्षण केंद्र चालविणा-या स्वयंसेवी महिला मंडळांना / संस्थांना सहाय्यक अनुदान देण्यात येते. 30 महिलांसाठी 6 महिन्यांचे एक प्रशिक्षण सत्र या प्रमाणे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येतो. यासाठी स्वयंसेवी महिला मंडळांना / स्वयंसेवी संस्थांना अनावर्ती अनुदान रू. 28,500/- व प्रती सत्र आवर्ती अनुदान रू. 21,500/- देण्यात येते. या योजनेखाली संगणक, रेडिओ/टी.व्ही. दुरूस्ती, विजेच्या उपकरणांची दुरूस्ती, टंकलेखन, लघुटंकलेखन, भरतकाम, फलोत्पादन, रेशीम उद्योग, बाहुल्या व खेळणी तयार करणे, कृषीसंबंधी व्यवसाय अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातात. भांडवल व कर्जपुरवठा कमाल कर्जमर्यादा: लागू नाहीबँकेचा सहभाग व व्याजदर : लागू नाहीस्वतःचा सहभाग : नाहीयंत्रणेचा सहभाग व व्याजदर : 100%अनुदान : प्रति लाभार्थी दरमहा रू. 75/- विद्यावेतनतारण : आवश्यकता नाहीइ. एम. आय. :लागू नाहीपरतफेडीची सुरूवात : लागू नाही.परतफेडीचा कालावधी :लागू नाही. शेरा या योजनेचा लाभ आर्थिकदृष्टया मागास कुटुंबातील महिला व मुलींना घेता येतो. महिला व मुलींना तांत्रिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. प्रशिक्षणासाठी संबंधित जिल्ह्यांचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. टंकलेखन, लघुलेखन व संगणक प्रशिक्षणासाठी इ. 9 वी पास पात्रता आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असणा-या महिला / मुली या आर्थिकदृष्ट्या मागास व दुर्बल घटकातील असणे आवश्यक आहे.