जीवनप्रमाण विषयी ‘जीवन प्रमाण’ च्या सेवेचा लाभ घेण्यासाठी आपले स्वागत. ‘जीवन प्रमाण’ म्हणजे निवृत्तीवेतन घेणाऱ्यांसाठी ‘हयातीचा डिजिटल दाखला’. ‘जीवन प्रमाण’मार्फत निवृत्तीवेतनधारकांना डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून ती बायोमेट्रिक पद्धतीने घडते. ही सुविधा केंद्र सरकारचे व राज्य सरकारचे कर्मचारी तसेच अन्य सरकारी संस्थांच्या सेवेतून निवृत्त झालेल्यांसाठी आहे. विविध सरकारी संस्थांच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतानावर निर्वाह व कौटुंबिक उत्पन्नाकरिता अवलंबून असल्याने, भारतात एक कोटींहून अधिक कुटुंबे ही निवृत्तिवेधनधारकांची कुटुंबे म्हणून गणली जातात. केंद्र सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ५० लाख असून राज्य सरकारे तसेच केंद्रशासित प्रदेशांचे व अन्य सरकारी संस्थांचे निवृत्त कर्मचारीही साधारण तितकेच आहेत. यात सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे निवृत्त कर्मचारीही आले. त्याशिवाय संरक्षण दलांचे निवृत्त कर्मचारीही २५ लाखांहून अधिक आहेत. सेवेतून निवृत्त झाल्यानंतर निवृत्तीवेतनधारकांना पार पाडावी लागणारी महत्त्वाची आवश्यक कार्यालयीन कार्यवाही म्हणजे बँक, पोस्ट आदी ज्या वेतनवितरण संस्थेच्या ठिकाणी निवृत्तीवेतन येते तेथे हयातीचा दाखला सादर करणे. तसे केल्यानंतरच त्यांच्या खात्यांवर त्यांचे निवृत्तीवेतन जमा होणार असते. निवृत्तीवेतन मिळवण्यासाठी निवृत्तीवेतनधारकारला वेतनवितरण संस्थेच्या ठिकाणी एकतर स्वत: हजर राहून हयातीचा दाखला द्यावा लागतो किंवा त्यांनी जेथे नोकरी केली त्या कार्यालयातून तो मिळवून वेचतनवितरण संस्थेला सादर करावा लागतो. स्वत: हजर राहून हयातीचा दाखला द्यावा लागणे किंवा नोकरी केलेल्या संस्थेच्या त्या कार्यालयातून तो मिळवून वेतनवितरण संस्थेला सादर करावा लागणे ही आवश्यक अट हीच बऱ्याच वेळा निवृत्तीवेतनधारकापर्यंत निवृत्तीवेतनाची रक्कम पोहोचण्यातील अडचण ठरते. आपण स्वत: कोणा अधिकाऱ्यांपुढे हजर राहून हयातीचा दाखला देणे किंवा तो कार्यालयामधून मिळवणे यासाठी प्रत्यक्ष त्या त्या ठिकाणी जाण्याची क्षमता प्रत्येक वेळी निवृत्तीवेतनधारकांमध्ये असतेच असे नाही. आणि त्यामुळे निवृत्तीवेतनाची रक्कम मिळवणे जिकीरीचे होणे तसेच विनाकारण असुविधेस तोंड द्यावे लागणे असे प्रकार विशेषत: वृद्ध निवृत्तीवेतनधारकांच्या बाबतीत घडतात. याशिवाय अनेक सरकारी कर्मचारी त्यांच्या निवृत्तीनंतर कुटुंबातील सदस्यांसोबत राहाणे वा अन्य कारणांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक होणे पसंत करतात परिणामी त्यांच्या हक्काचे निवृत्तीवेतन ज्याने त्याने हाती घेण्याच्या दृष्टीने कार्यवाही किचकट होऊन बसते. नेमकी हीच समस्या हाताळणारी ‘निवृत्तीवेतनधारकांसाठी हयातीचा डिजिटल दाखला’ ही भारत सरकारची योजना असून ‘जीवन प्रमाण’ असे तिचे नाव आहे. हयातीचा दाखला मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया डिजिटाइज करण्यासाठी ही योजना आहे. ती आखण्यात आली आहे. हयातीचा दाखल मिळवण्याची प्रक्रिया सुटसुटीत करणे व निवृत्तीवेतनधारकांकरिता ती सुलभ व विनात्रासाची करणे हे तिचे उद्दिष्ट आहे. निवृत्तीवेतनधारकास वेतनवितरण संस्थेसमोर किंवा नियोक्त्याच्या कार्यालयासमोर प्रत्यक्ष हजर राहण्याची अट या योजनेमुळे इतिहासजमा होईल त्याचप्रमाणे येण्याजाण्यातील अनावश्यक अडचणी दूर होऊन हिचा निवृत्तीवेतनधारकांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल. कार्यवाही कशी होते निवृत्तीवेतनधारकांचे बायोमेट्रिक पद्धतीने अधिकृतीकरण करण्यासाठी ‘जीवन प्रमाण’ ‘आधारचा मंच’ वापरात आणते. अधिकृतीकरण यशस्वी होते तेव्हा हयातीचा डिजिटल दाखला तयार केला जातो. हा ‘जीवन प्रमाणपत्र संग्रहालय’ येथे कायमस्वरूपी जपून ठेवला जातो. पेन्शन वितरण संस्था हे प्रमाणपत्र ऑनलाइन पाहू शकते. आधार अधिकृतीकरण बोटाचा ठसा किंवा बुबुळांची ओळख देऊन आपले बायोमेट्रिक्स सादर करा आणि स्वत:ची अधिकृत ओळख द्या. (ऑनलाइन बायोमेट्रिक अधिकृतीकरणासाठी ‘जीवन प्रमाण’ हे आधार मंचाचा उपयोग करीत असते.) * * आपली नावनोंदणी करणे आपण आपली नावनोंदणी करण्यासाठी संगणक/ मोबाइल अप्लिकेशन डाऊनलोड करून ती करावी. किंवा याला पर्याय म्हणजे जवळच्या ‘जीवन प्रमाण’ केंद्रात प्रत्यक्ष जाऊन नावनोंदणी करावी. त्यासाठी आधार क्रमांक, निवृत्तीवेतन अदाकरण आदेश (पेन्शन पेमेंट ऑर्डर), बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव व आपला मोबाइल क्रमांक आदी आवश्यक त्या बाबी सादर कराव्यात. आपले प्रमाणपत्र पाहणे ‘जीवन प्रमाण’ वेबसाइटवर ओळखक्रमांक देऊन किंवा आधार क्रमांक देऊन आपण आपले प्रमाणपत्र PDF स्वरूपात डाऊनलोड करू शकता. * जीवन प्रमाणपत्र यशस्वी झाल्यानंतर आपल्या मोबाइलवर पोचपावती म्हणून एक एसएमएस येतो व यात ‘जीवन प्रमाण’ चा प्रमाणपत्र ओळख दिलेला क्रमांक असतो. निवृत्तीवेतनधारकांना तसेच पेन्शनवितरण संस्थेला ही प्रमाणपत्रे केव्हाही, कोठेही उपलब्ध व्हावीत म्हणून ‘जीवन प्रमाणपत्र संग्रहालया’मध्ये जपून ठेवली जातात. पेन्शनवितरण संस्था पेन्शनवितरण करणारी संस्था ही वेबसाइटवर ‘जीवन प्रमाण’ पाहू शकते आणि ते डाऊनलोडही करू शकते. * * इलेक्ट्रॉनिक बटवडा पेन्शन वितरण संस्थेला जीवन प्रमाणपत्रे (हयातीचा दाखला) इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेही पोहोचवली जाऊ शकतात. यात कोणत्याही व्यक्तीचा हस्तक्षेप होत नाही. (ई-बटवडा सुविधा कार्यरत करण्यासाठी पेन्शन वितरण संस्था आमच्या चमूशी संपर्क करू शकते.) प्रमाणपत्र मिळवणे हे डिजिटल जीवन प्रमाणपत्र मिळवणे हे त्रासरहित आहे आणि विविध ‘जीवन प्रमाण’ केंद्रांमधून ते मिळवता येते. ही केंद्रे सामाईक सेवा केंद्रे, बँका आणि सरकारी कार्यालयांकडून चालवली जातात. किंवा प्रमाणपत्र संगणक/ मोबाइल/ टॅबलेट वरून ‘क्लायंट अर्जा’ता वापर करून मिळवता येते. जीवन प्रमाणपत्रासाठी नोंदणी करण्याकरिता संगणक/ मोबाइल/ टॅबलेटवर अॅप डाउनलोड करावे. संगणक मोबाइल कार्यालये Windows 7(किंवा त्याहून सुधारित) OS 32 आणि 64 bit. अँड्रॉइड 4.0 आणि त्याहून वरचा केंद्र व राज्य सरकारी कार्यालये अर्ज कसा डाऊनलोड करावा विंडोज तसेच अन्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमकरिता विंडोज तसेच अन्ड्रॉइड ऑपरेटिंगचे सोफ्टवेअर जे वापरतात त्यांना जीवन प्रमाण अर्ज डाऊनलोड करता येईल. क्लायन्ट सॉफ्टवेअर हे हयातीचा दाखला प्रमाणीकृत करण्याकरिता नोंदवण्याची कार्यवाही करण्यासाठी सहाय्यभूत आहे. ते आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण मंच वापरेल. डाऊनलोडला सुरुवात करण्यासाठी कृपया अर्जामध्ये तुमचा ई-मेल लिहा. फॉर्ममध्ये ई-मेल पत्ता लिहिल्यानंतरच तुम्हाला लिंक उपलब्ध होईल. क्लायन्ट सॉफ्टवेअर हे केवळ निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला नोंदणीकरण करण्याच्या कामासाठी बनवण्यात आलेले आहे. या अर्जाचा वापर अन्य कोणत्याही कारणासाठी करणे प्रतिबंधित आहे. ** (उपभोक्ता क्लायन्ट) सॉफ्टवेअरसाठी बायोमेट्रिक बोटांचे ठसे/आयरस स्कॅनर उपकरणाची गरज असेल. आपल्याला मदत हवी असेल तर jeevanpramaan@gov.in येथील मदतकक्षास संपर्क करा. विंडोज सेवन/ एट (windows7/8) (32/64 bit) ही संगणक प्रणाली त्यासाठी आवश्यक आहे. अर्ज डाउनलोड करण्यासाठी पुढील गोष्टी आवश्यक आहेत. Microsoft.Net हे फ्रेमवर्क हवे व त्याचे वर्जन 4 हवे. विंडोज संगणकाला Microsoft Visual C++ 2010 Re हे डिस्ट्रिब्युटेबल पॅकेज (x86) हवे. तर 64bit च्या विंडोज संगणकाला Microsoft Visual C++ 2010 Re हे डिस्ट्रिब्युटेबल पॅकेज (x64) हवे. परिस्थितीनुरूप आकार घेणारी व्यवस्था (सेटिंग) (इन्स्टॉलेशनच्या कागदपत्रांनुसार) अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा स्त्रोत : जीवन प्रमाण