रस्ते अपघातानंतर तत्काळ मदत न मिळाल्यानेही अनेकांचा जीव जात आहे. आता अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळवी यासाठी महामार्ग पोलिसांनी पुढाकार घेऊन 'स्वरक्षा' नावाचे मोबाइल अप्लिकेशन तयार केले आहे.

६ जानेवारी २०१४ रोजी महामार्ग पोलिसांनी 'स्वरक्षा' नावाचे अप्लिकेशन तयार केले आहे. हे अप्लिकेशन Android मोबाइलसाठी गूगल प्लेमध्ये विनामुल्य उपलब्ध आहे.

या अप्समध्ये सर्व महामार्ग पोलिस विभागांची माहिती देतानाच नजीकचे रुग्णालय, गेराज ( Garage), रूग्णवाहिका, खाजगी रुग्णालय, पोलिस स्टेशन इत्यादी माहितीही मिळते. आतापर्यंत एक हजारापेक्षा अधिक लोकांनी हे अप्लिकेशन डाऊनलोड केले आहे.

यात डाऊनलोड करणा-याचे नाव,पत्ता, ब्लडग्रुप, नातेवाईकाचा पत्ता आणि महामार्ग पोलिसांच्या नियंत्रण कक्षाचा हेल्पलाईन नंबर स्टोअर केलेला असतो. या अप्समध्ये top for Emergency या आयकॉनवर क्लीक केल्यास नातेवाईक आणि पोलिसांना एनर्जी एसओएस एसएमएस केला जातो. सदर एसएमएस पाठवणा-यांचे जीपीएस लोकेशन असते. त्यामुळे तत्काळ मदत मिळू शकते.

माहिती स्रोत - लोकमत, अहमदनगर, ८ जून २०१४.

माहिती लेखन: बाळू निवृत्ती भांगरे, खडकी बुद्रुक, ता.अकोले.