महसूल विभाग अधिकारी

१. जिल्हाधिकारी

२. अप्पर जिल्हाधिकारी

३. निवासी उपजिल्हाधिकारी

४. उपविभागीय जिल्हाधिकारी

५. तहसीलदार

६. मंडळ अधिकारी

७. तलाठी

महसूल विभाग जबाबदा-या

आपत्तीपूर्व नियोजन

१. आपआपल्या विभागावर आपत्ती व्यवस्थापन समित्यांची बैठक घेऊन आपत्ती निवारणासाठी नियोजन करणे.

२. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा / तालुका आपत्ती व्यवस्थापन आराखडा / गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे. या आरखडयाचे दोनदा अद्यावतीकरण करणे.

३. आपल्या विभागातील संपर्क यंत्रणा सज्ज ठेवणे. असेच आपली संपर्क यंत्रणा बिघडल्यास त्यास पर्यायी यंत्रणा तयार ठेवणे.

४. आपआपल्या क्षेत्रात आपत्तीच्या काळात लोकांना हलवण्यासाठी सुरक्षित निवा-यांची व्यवस्था करून ठेवावी.

५. नियंत्रण कक्षाची तपशीलवार व्यवस्था करावी. नियंत्रण कक्ष २४ × ७ मध्ये सुरु ठेवावे.मदत आणि सोडवणूक कार्यासाठी आवश्यक कार्यासाठी आवश्यक असणारे साहित्य जमा करून ठेवावे. उदा. मेणबत्ती,बॅटरी, लाईफ जाकेट, गाडीचे टयूब, पेट्रोमॅक्स, दोर, सर्च लाईट, विविध करवती, मेगाफोन, पोहणा-या व्यक्तीची यादी (फोन नं सहीत) इत्यादी.

६. आपत्तीच्या काळात लागणा-या जडसंसाधनाची उपलब्धता आपल्या परिसरात कोठे आहे याची यादी करून ठेवावी. उदा. जे.सी.बी, पोकलन, ट्रक, बोटी, जनरेटर इत्यादी.

७. जिल्हा/ तालुका/ गावांचे नकाशे नियंत्रक कक्षेत ठेवावेत. (तसेच संपर्क यंत्रणा अद्यावत ठेवावी.)

८. स्वयंसेवी संस्था आणि त्याचे सदस्य यांचे पत्ते आणि दूरध्वनी क्रमांक दर्शनीय भागात लावावेत.

९. आपल्या विभागातील माहिती www.idrn.gov.in या वेबसाईटवर अद्यावत करण्यासाठी उपलब्ध करून दिले जाईल.

१०. आपल्या विभागातील प्रशिक्षित गटाच्या नियमित संपर्कात राहून रंगीत तालीमचे ( Mock Drills ) आयोजन करणे.

आपत्तीची सूचना मिळताच करावयाची कार्यवाही

१. आपत्तीची सूचना मिळताच तालुका, गाव पातळीवरील अधिकारी यांना त्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याच्या सूचना देणे.

२. विविध विभागाच्या अधिका-यांच्या तयार केलेल्या गटांनी नियोजनानुसार कार्य करण्यास सुरुवात कारणे. उदा. मदत व सोडवणूक गट, प्रथमोपचार गट इत्यादी.

३. सदर बाबीची खात्री करून आपत्ती विषयक माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास व वरिष्ठ अधिका-यांना देणे.

आपत्तीच्या काळात

१. आपत्तीच्या काळात महसूल खाते अग्निशमन खात्याच्या मदतीने सोडवणुकीचे कार्य करेल.

२. जखमींना उपचारासाठी हलविण्यासाठी वाहनाची व्यवस्था प्राधान्याने करणे तसेच मृत व्यक्ती आणि जनावरांना हलविण्याची व्यवस्था करणे. यासाठी एस.टी. महामंडळाच्या बसेस, शासकीय वाहने आणि खाजगी वाहनाचा वापर केला जाईल.

३. अतिसंवेदनशील भागात लाउडस्पीकर असलेल्या वाहनावरून दक्षतेचा इशारा देईल.

४. जनजीवन सुरळीतपणे सुरु होण्यासाठी दळणवळण व्यवस्था पूर्ववत करणे.

५. लोकांची सोडवणूक करून त्याचे स्थलांतर करावे तसेच तात्पुरत्या निवारा आणि अन्नधान्याची व्यवस्था करावी.

६. खाजगी वाहनाचे अधिग्रहण जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केले जाईल.

७. महसूल यंत्रणेमार्फत आरोग्य विभागाच्या मदतीने साथीचे रोग पसरणार नाहीत यासाठी उपाययोजना करावी.

८. अन्न, पाणी यांचे निरीक्षण करूनच त्याचे वितरण केले जाईल.

९. प्रतिसाद योजनेसाठी स्वयंसेवी संस्था आणि खाजगी व्यक्ती/ कंपनी यांच्याकडून मदतीचे आवाहन केले जाईल.

१०. कपडे, शिधा (सुके धान्य) यांचे वाटप करणे तसेच स्वयंपाकासाठी आवश्यक वस्तूंची उपलब्धता करणे.

११. सानुग्रह अनुदानाचे वाटप करणे.

माहिती संकलन : बाळू भांगरे

माहिती स्रोत: आपत्ती जोखीम कार्यक्रम, जिल्हा अधिकारी कार्यालय व जिल्हा नियंत्रण कक्ष,गडचिरोली