उद्देश व स्वरुप आदिवासींच्या शैक्षणिक विकासाकरिता कार्यरत असलेल्या स्वेच्छा संस्थांमार्फत स्थापन करण्यात आलेल्या आश्रमशाळांना 1953-54 पासून अनुदान देण्याची योजना राबविण्यात येत आहे. या आश्रमशाळांत आदिवासी विद्यार्थ्यांना निवास, भोजन, गणवेष, शैक्षणिक साहित्य व इतर सवलती मोफत उपलब्ध करुन देण्यात येतात. त्याकरिता कर्मचा-यांचे पगार व परीक्षणाकरिता विहित प्रमाणात अनूदान शासनाकडून देण्यात येते. प्रवेशाच्या अटी शासकीय आश्रमशाळेत प्रवेशाकरिता असलेल्या सर्व अटी लागू. संपर्क : संबंधित आश्रमशाळांचे मुख्याध्यापक / संस्था चालक. अनुदानित आश्रमशाळेस मान्यतेकरिता अटी 1. संस्था नोंदणीकृत असली पाहिजे. 2. विहित नमून्यात आश्रमशाळा सुरु करण्याच्या ठिकाणाचे सर्वेक्षण, उपलब्ध विद्यार्थी संख्या, संस्थेची आर्थिक स्थिती, आदिवासी क्षेत्रातील कार्य इ. च्या माहितीसह अर्ज करणे आवश्यक. संपर्क- संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प. माहिती संकलन: प्राची तुंगार स्त्रोत: आदिवासी विकास विभाग