महाराष्ट्र राज्यात डोंगराळ व दुर्गम भागात राहणा-या अनुसूचित जमातीचे सामाजीक व शैक्षणिक प्रगती होण्यासाठी सन 1972-73 पासून क्षेत्रविकासाचा दृष्टीकोन स्विकारण्यात आला अशा भागाचा मूलभूत विकास व्हावा आणि त्याचा फायदा सर्वांना व्हावा यासाठी तेथे मूळ केंद्रस्थान म्हणून आश्रमशाळा आसावी या शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांची इ. 10 वी पर्यंतच्या शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. सदर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना निवास, भोजन, गणवेश,आंथरुण पांघरुण, पुस्तके व इतर लेखन साहित्य इ. सुविधा शासनाकडून मोफत पुरविण्यात येतात. पात्रता आश्रमीय विद्यार्थी हे आदिवासीच असावे. मुला-मुलीस 31 जुलैला 5 वर्ष पूर्ण असावी प्रत्यक्ष प्रवेश देतेवेळी जाती / जमातीचा दाखला, जन्मतारखेचा दाखला, आई-वडीलांचे प्रतिज्ञापत्र. पहिली व्यतिरिक्त इतर वर्गातील प्रवेशाकरिता पूर्वीच्या शाळेचा शाळा सोडल्याचा दाखला. आश्रमशाळेच्या 1 कि.मी. परिसरातील मुले-मुली अनिवासी म्हणून व त्या क्षेत्राच्या बाहेरील निवासी विद्यार्थी म्हणून प्रवेश. आश्रमशाळेत प्रत्येक वर्गात निवासी 40 व बहिस्थ 10 विद्यार्थी. आश्रमशाळेमध्ये मुला मुलींचे प्रमाण 50 : 50 प्रमाणे व 50 टक्के मुली मिळाल्या नाहीतर विद्यार्थीनींची क्षमता किमान 33 टक्के आवश्यक जर सदर टक्केवारी पूर्ण झाली नाही तर आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देवून क्षमता पूर्ण करणे. आश्रमशाळांमध्ये प्रत्येक वर्गात शारीरीक दृष्टया अपंग विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आरक्षण. दारीद्रय रेषेखालील आदिवासी जमातीच्या भूमिहीन /अल्पभूधारक विद्यार्थ्यांना प्राधान्य. संपर्क संबंधीत मुख्याध्यापक, शासकीय आश्रमशाळा. माहिती संकलन: प्राची तुंगार स्त्रोत: आदिवासी विकास विभाग