प्रस्तावना

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था १ मे १९६२ रोजी पुणे येथे केंद्र सरकार पुरस्कृत योजनेंतर्गत सुरु करण्यात आली. या संस्थेचे आयुक्त हे प्रमुख आहेत व संस्थेच्या दैनंदिन कामकाजासाठी त्यांना सहाय्य करण्यासाठी एक सहा संचालक व एक उपसंचालक कार्यरत आहेत.

संस्थेची उद्दिष्टे

केंद्र व राज्य शासनामार्फत आदिवासी समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासाकरिता राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या आदिवासी जीवनावर झालेल्या परिणामांचे मूल्यमापन करणे.

आदिवासी जीवन व विकास या विषयावर संशोधन करणे.

आदिवासी विकास विभागात कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी सेवांतर्गत प्रशिक्षण तसेच आदिवासी विद्यार्थ्याकरता सेवापूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे.

आदिवासींसाठी प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करणे.

आदिवासी कळा व संस्कृती जतन करण्यासाठी आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय चालवणे व हस्तकला प्रदर्शन, लघुपटाची निर्मिती करणे.

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांच्या कामकाजावर प्रशासकीय नियंत्रण ठेवणे.

संशोधन शिष्यवृत्ती

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून दरवर्षी दोन विद्यर्थ्यांना संशोधन अधिछात्रवृत्ती देण्यात येते. आदिवासी जमातींचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळण्याच्या उद्देशाने ही शिष्यवृत्ती या संस्थेकडून देण्यात येते. तसेच केंद्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या डॉक्टरल रिसर्च फेलोशिप व पोस्ट डॉक्टरल रिसर्च फेलोशिपसाठीचे राज्यातील विद्यार्थ्यांचे अर्ज ही संस्था केंद्राकडे शिफारशीसह पाठवते. आलेल्या अर्जामधून राष्ट्रीय पातळीवर २५ विद्यार्थ्यांना ही फेलोशिप मिळते.

संदर्भ : नॅशनल सेंटर फॉर अॅडव्होकसी स्टडीज, पुणे.