अ. क्र.

योजना

सविस्तर माहिती

1.

योजनेचे नाव

विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व इतर शैक्षणिक सवलती .

2

योजनेचा प्रकार

राज्यस्तरीय योजना.

3

योजनेचा उद्देश.

विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी राज्य शासनाने शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती देण्याची योजना शासननिर्णय क्र.ईबीसी-1095/प्र.क्र.91/मावक-2, दि.29.10.1996 अन्वये सन 1995-96 पासून लागू केलेली आहे. या योजनेसाठी राज्य शासनामार्फत 100% शिष्यवृत्तीची तरतूद उपलब्ध करुन दिली जाते.

4

योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव

विशेष मागास प्रवर्ग.

5

योजनेच्या प्रमुख अटी

पालकाचे गतवर्षीचे वार्षिक उत्पन्न रु.1 लाखा पर्यंत असावे.

पूर्णवेळ नोकरी करणारा उमेदवार योजनेच्या लाभास पात्र नाही.

त्याच इयत्तेत पुन:प्रवेशित विद्यार्थी लाभास पात्र नाही, तथापि उत्तीर्ण होवून पुढील इयत्तेत गेल्यानंतर त्यास योजनेचा लाभ अनुज्ञेय होईल.

एका पालकाचे दोन विद्यार्थी (मुली वगळून) योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.

इतर शिष्यवृत्तीचा लाभ स्वीकारलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय होणार नाही.

6

दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप

वसतिगृहात न राहणा-या पात्र विद्यार्थ्यांस दरमहा रु.90/- ते 190/- एवढी व वसतिगृहात राहणा-या विद्यार्थ्यांस दरमहा रु.150/- ते 425/- एवढी शिष्यवृत्ती दिली जाते.

तसेच पालकाचे उत्पन्न रु. 1.00 लाखापेक्षा जास्त व रु. 4.50 लाखाच्या आत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्काची (Freeship) प्रतिपूर्ती करण्यात येते.

7

अर्ज करण्याची पध्दत

सदर योजनेचे संगणकीकरण झालेले असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. लाभार्थी विद्यार्थ्यांनी https://mahaeschol.maharashtra.gov.in
या वेबसाईटवर वि.मा.प्र. विद्यार्थ्यांना राज्य सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती या योजनेंतर्गत अर्ज भरुन महाविद्यालयास सादर करावा. संबंधित महाविद्यालयाने सर्व कागदपत्रांची छाननी करुन पात्र लाभार्थ्यांचे अर्ज संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे मंजूरीसाठी सादर करावेत.

8

योजनेची वर्गवारी

शैक्षणिक

9

संपर्क कार्यालयाचे नांव

संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण.

संबंधित शाळा / महाविद्यालयाचे प्राचार्य.

स्त्रोत :  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन