योजनेविषयी अ.क्र.योजनासविस्तर माहिती १७.५ योजनेचे नांव मुदती कर्ज योजना २ योजनेचा प्रकार केंद्र शासनाच्या योजना राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (एन.एस.एफ.डी.सी.), नवी दिल्ली यांच्या योजना ३ योजनेचा उद्देश अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात. ४ योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अनुसूचित जातीतील चर्मकार समाज. ५ योजनेच्या प्रमुख अटी अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांपर्यत असावे. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा. ( अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे. (ब) राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रु.१०००००/ पर्यंत असावे. जातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकायाने दिलेला असावा. अर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा. महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील. ६ दिल्या जाणाया लाभाचे स्वरुप एनएसएफडीसी यांच्या विविध योजनांना उद्योगांना रु.१ लाख ते रु.२.५ लाख मुदती कर्ज सहाय्यता देते. तसेच वाहनांसाठी कर्ज मर्यादा वेगवेगळी आहे. सदर उद्योगाच्या लागत किंमतीच्या ७५ टक्के मुदती कर्ज देण्यात येते. त्याचबरोबर या महामंडळाकडून २० टक्के बीजकर्ज व रु.१००००/ अनुदान देण्यात येते. उर्वरित ५ टक्के लाभार्थ्यांचा सहभाग असतो. मुदती कर्जावर एनएसएफडीसी कर्जाच्या हिस्स्यावर द.सा.द.शे. ७ टक्के तसेच महामंडळाच्या बीज कर्जावर द.सा.द.शे. ४ टक्के आहे. रुपये ५ लाखापेक्षा जास्त उद्योगाच्या कर्जातील एनएसएफडीसी कर्जाच्या हिस्स्यावर द.सा.द.शे. ८ टक्के आहे व महामंडळाच्या बीज कर्जावर द.सा.द.शे. ४ टक्के आहे. मुदती कर्ज परतफेड दरमहा करावी लागेव व त्याचा कालावधी ६० हप्त्यांपर्यंत आहे. ७ अर्ज करण्याची पध्दत अर्जाचा नमुना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात विनाशुल्क स्वरुपात उपलब्ध असेल. अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे. ८ योजनेची वर्गवारी रोजगारनिर्मिती ९ संपर्क कार्यालयाचे नांव सोबत जिल्हा कार्यालयांची यादी जोडली आहे. योजनेची सांख्यिकी माहिती (रुपये लाखात) अ.क्र.वर्षखर्चलाभार्थी १ २०१२-१३ १२३३.८८ ७०० २ २०१३-१४ ६४८.०४ ४२५ ३ २०१४-१५ ८१३.६९ ४७० स्त्रोत - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन