स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या विशेष शाळा / कार्यशाळांमधून अपंगांचे शिक्षण व प्रशिक्षण अ.क्रयोजनासविस्तरमाहिती 1. योजनेचेनाव स्वयंसेवीसंस्थामार्फतचालविण्यातयेणाऱ्याविशेषशाळा/ कार्यशाळांमधूनअपंगांचेशिक्षणवप्रशिक्षण 2. योजनेचाप्रकार राज्यशासन 3. योजनेचाउदेश 6 ते18 वयोगटातील अपंग विद्यार्थ्यांना स्वयंसेवी संस्थंामार्फत चालविण्यात येणाऱ्या अपंगांच्या विविध शाळांमधून अंध, मुकबधिर, अस्थिव्यंग व मतिमंद मुलांना शिक्षण व निवासाची विनामुल्य सुविधा पुरविल्या जातात. तसेच18 वर्षावरील अपंग विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या व्यवसायाचे अंपगंत्वानुरूप व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळांमधून दिले जाते 4. योजनाज्याप्रवर्गासाठीलागूआहे अंध,कर्णबधिर,अस्थिव्यंग,मतिमंद 5. योजनेच्याप्रमुखअटी विहीत नमुन्यात संबंधीत शाळा/कर्मशाळा यांचेकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जदाराचे अपंग किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावे. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. 6. दिल्याजाणाऱ्यालाभाचेस्वरूप अपंग विचारात घेवून अपंगत्वानुरुप शिक्षण व विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येते. त्याचप्रमाणे त्यांच्या निवास व भोजनाची विना मुल्य व्यवस्था करण्यात येते. 7. अर्जकरण्याचीपध्दत विहीतनमुन्यातीलअर्जआवश्यकत्याकागदपत्रासहसादरकरणे. 8. योजनेचीवर्गवारी शैक्षणिक 9. संपर्ककार्यालयाचेनाव स्वयंसेवी संस्था व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर स्त्रोत - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन