अ. क्र.

योजना

सविस्तर माहिती

1.

योजनेचे नाव

शासकीय संस्थांमधून अपंगांचे शिक्षण आणि प्रशिक्षण

2.

योजनेचा प्रकार

राज्यशासन

3.

योजनेचा उदेश

6 ते 18 वयोगटातील अपंग विद्यार्थ्यांना शासकीय शाळांमधून अंध, मुकबधिर, अस्थिव्यंग मुलांना शिक्षण, भोजन व निवासाच्या विनामुल्य सुविधा पुरविल्या जातात. तसेच शासकीय कार्यशाळांमधून 18 वर्षावरील अपंग विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या व्यवसायाचे अंपगंत्वानुरूप व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते

4.

योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे

अंध,कर्णबधिर,अस्थिव्यंग.

5.

योजनेच्या प्रमुख अटी

विहीत नमुन्यात शासकीय संस्था यांचेकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

अर्जदाराचे अपंग किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावे.

अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

6.

दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप

अपंग विचारात घेवून अपंगत्वानुरुप शिक्षण व विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येते. त्याचप्रमाणे त्यांच्या निवास व भोजनाची विना मुल्य व्यवस्था करण्यात येते.

7.

अर्ज करण्याची पध्दत

विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे.

8.

योजनेची वर्गवारी

शैक्षणिक

9.

संपर्क कार्यालयाचे नाव

संबंधीत शासकीय संस्था व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर

स्त्रोत - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन