वैयक्तिक थेट कर्ज योजना उद्देश्य : मुख्यत्वे कमी भांडवलामध्ये व्यवसाय सुरु करणे. कर्जाची कमाल मर्यादा: रुपये २० हजार. व्याजदर: दरसाल दरशेकडा २%. परतफेडीचा कालावधी: ३ वर्षे (मासिक/ त्रैमासिक) उत्पन्नाची कमाल मर्यादा: १ लाखापर्यंत (उत्पन्नाचा दाखला जोडावा) वय मर्यादा : १८ ते ५५ वर्षे मुदत कर्ज योजना (लहान व मध्यम व्यवसायासाठी) प्रकल्प मर्यादा: रुपये ५ लाख पर्यंत व्याजदर (वार्षिक): रुपये ५०,०००/- पर्यंत ५% रुपये ५०,०००/- वरील ६% स्त्री लाभार्थींना १% सुट अनुज्ञेय आहे. परतफेडीचा कालावधी : रुपये ५०,०००/- पर्यंत - ५ वर्षे रुपये ५०,०००/- ते रुपये ५ लाखांपर्यंत – ७ वर्षे मंजुरीचे अधिकार: व्यवस्थापकीय संचालक, मुंबई माहिती संकलक : अतुल पगार स्त्रोत : http://www.mshfdc.com/index.php/2013-03-08-09-00-16/2013-03-08-09-23-48